शाळा संपली आणि दहावीच्या सुट्टीमध्ये शाळेमध्येच पौरोहित्य वर्गाला जाऊन पौरोहित्य शिकले. अतिशय वेगळा आणि सात्विक अनुभव होता. शाळा ज्ञान प्रबोधिनी, त्यामुळे सगळ्या कृती, श्लोक, त्यांचे अर्थ, त्यांच्या चाली, लागणारी सामुग्री यथावकाश पण नीट, अर्थ समजून उमजून शिकवलं गेल. त्यानंतर घरामध्ये गणेश चतुर्थीला मी सांगणार आणि बाबा कार्य सिद्धीस नेणार हा नेम. मग काही दिवसांनी आवडीने सत्यनारायाणापासून अगदी श्राद्ध विधींपर्यंत सारं काही शिकून घेतल.
आज सकाळी एका मैत्रिणीचा फोन आला त्यानिम्मिताने सगळं आठवल. ''ते पूजा वगैरे जमेल न सांगायला? सत्यनारायण… मोजून १५-२० मिनिटांच काम आहे. अगं, गडबड आहे ग फार, आणि बाकी पुजारी वगैरे फारच वेळ लावतात, बघ जमतय का…'' इति. मी माझ्यापरीने समजवायचा प्रयत्न केला. मुळात पौरोहित्य हे काही माझं काम (म्हणजे व्यवसाय बर का) नाही, कारण मी ते काम मानत नाही. माझ्या मनाला एक प्रकारची विलक्षण शांतता देणारी कृती आहे ती. आणि आग्रहाच्या अश्या निमंत्रणापेक्षा मी ज्यांच्याकडे भरपूर वेळ आणि आवड आहे अशा निमंत्रणांना स्विकारेल.
पौरोहित्य म्हणजे नेमक काय? हा अगदी चर्चेचा विषय होऊ शकतो. निवडक श्लोकांचे उच्चारण, चित्रपटातल्या गाण्यांसारखा वेग हे अस काही अजिबातच नाही. प्रत्येक मंत्र कसा म्हणायचा? आहे तसा? की संधी विग्रह करून? आणि संधी विग्रह केला तर बऱ्याच वेळा अर्थ बदलू शकतो त्याचं काय? आचमन करायला लावण्यामागच प्रयोजन काय? एखादी अशी गोष्ट/ कृती घडली की ज्या मुळे लक्ष विचलीत होऊ शकत उदा. शिंका जांभई तर आचमन करणे अगदी योग्य. अतिशय पवित्र, सात्विक असे हे पौरोहित्य काही जणांचा व्यवसाय असू शकतो, आहेच. पण म्हणून हा एकच दृष्टीकोन उरला आहे का पौरोहित्याकडे बघायचा?